भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक जाहला

nirgun nirakar vruksha akarala | panchatattve vyapak jahala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक जाहला ॥१॥ कान्होबा हें बोलणें माझें कोडें । पंचाविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥ साठ ऐशीं शोभती शाखा । नवलक्ष पल्लव भोंवती रे ॥३॥ चौर्‍यांयशी लक्षांची मिळणी । वृक्षरूपीं एका जनार्दनीं देखा रे ॥४॥