भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरसुनी ज्ञान महविती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरुप माझें

nirasuni dnyan mahaviti vidnyan | tyahuni abhinna svarup majhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निरसुनी ज्ञान महविती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरुप माझें ॥१॥ पिंड आणि ब्रह्मांड म्हणिजे अखम्ड । याहुनी उदंड स्वरुप माझें ॥२॥ माया आणि ममत्व शोधुनी शुद्ध सत्व । सत्वाचें निज सत्व स्वरुप माझें ॥३॥ सद आणी चिद म्हणती आनंद । त्याहुनी अभेद स्वरुप माझें ॥४॥ एका जनार्दनीं एकपणातीत । चित्ताचें अचिंत्य स्वरुप माझें ॥५॥