भजनी मालिका
← भजनांकडे परत

निःशेष कांहीं नेणिजे । तें शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जें जेणें जाणिजे । तें अज्ञान कैसें बा

nihshesh kanhin nenije | ten shuddha dnyan mhanije | ma sarva jen jenen janije | ten adnyan kaisen ba

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निःशेष कांहीं नेणिजे । तें शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जें जेणें जाणिजे । तें अज्ञान कैसें बा ॥१॥ ज्ञान तें कवण अज्ञान ते कवण । दोहोंचें लक्षण पाहतें पाहा ॥धृ॥ ज्ञानाचें जें ज्ञातेपण । तया नांवाची अज्ञान । अज्ञानाचें जे ज्ञान । तया नांव शुद्ध ज्ञान ॥२॥ ज्ञान तें अज्ञाना आलें । अज्ञान तें ज्ञाना गेलें । एका जनार्दनीं मुलें । बागुलाचीं दोनीं ॥३॥