भजनी मालिका
← भजनांकडे परत

निबलोण करुं पंढरीया सुखा । आणि पुडंलिका भक्तराया

nibalon karun pandhariya sukha | ani pudanlika bhaktaraya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निबलोण करुं पंढरीया सुखा । आणि पुडंलिका भक्तराया ॥१॥ परलोकींचे येती परतोनि मागुती । सर्व सुख येथें पहावया ॥२॥ अष्ट महासिद्धि जयाचिये द्वारीं । होऊनि कामारी वोळंगतीं ॥३॥ मुक्तिपद देतां न घे फुकासाठीं । ते हिंडे वाळुवंटी दीनरुप ॥४॥ एका जनार्दनीं करे निभलोण । विटेसहित चरण ओवाळावें ॥५॥