भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणतेपण पाडुरंगा ध्याई । सदोदित गाई रामनाम

nenatepan paduranga dhyai | sadodit gai ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेणतेपण पाडुरंगा ध्याई । सदोदित गाई रामनाम ॥१॥ मग तुज सोपे मार्ग ते असती । पांडुरंग चित्तीं दृढ धरी ॥२॥ एका जनार्दनीं काया वाचा मन । करी समर्पण देवापायीं ॥३॥