भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेम धरीं विठ्ठलामीं । पडुं नको वाउगा भ्रमीं । सांगतसे गृहस्थाश्रमीं । साधन सोपें

nem dharin viththalamin | padun nako vauga bhramin | sangatase gruhasthashramin | sadhan sopen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेम धरीं विठ्ठलामीं । पडुं नको वाउगा भ्रमीं । सांगतसे गृहस्थाश्रमीं । साधन सोपें ॥१॥ करी नामस्मरण । वाचे म्हणे नारायण । चुकेल पतन । यातायाती ॥२॥ इहलोक परलोक । धन्य होती सकळीक । उभय कुळ पावन देख । नाम स्मरतां ॥३॥ कलीमाजीं सोपें वर्म । उच्चारीं तूं श्रीराम । आणिक नको श्रम । वाउगाची ॥४॥ जाउनी पाहे तुं पंढरी । उभा असे विटेवरी । एका जनार्दनीं धरीं । चरण त्याचे ॥५॥