भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल दंभाचें कौतुक । अग्नहोत्री म्हणती याज्ञिक

naval dambhachen kautuk | agnahotri mhanati yadnyik

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नवल दंभाचें कौतुक । अग्नहोत्री म्हणती याज्ञिक ॥१॥ मंत्रतंत्राची कथा कोण । मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण ॥२॥ आम्ही स्वधर्मनिष्ठ पावन । दंभें म्हणती आपणा जाण ॥३॥ दांभिकांची भक्ति वाव । एका जनार्दनीं नाहीं ठाव ॥४॥