भजनी मालिका
← भजनांकडे परत

नातुडे जो योगी ध्याना । तो समचरण पंढरीये

natude jo yogi dhyana | to samacharan pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नातुडे जो योगी ध्याना । तो समचरण पंढरीये ॥१॥ भोळा सुलभ भाविकासी । दर्शनें सर्वांसी सारखा ॥२॥ अभेदाच्या न धांवे मागें । भाविकां लागे पाठोपाठीं ॥३॥ शुद्ध देखतांचि भाव । एका जनार्दनीं उभा देव ॥४॥