भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाठवेचि दुजें कानड्यावांचुनी । कानडा तो मनींध्यानी वसे

nathavechi dujen kanadyavanchuni | kanada to manindhyani vase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाठवेचि दुजें कानड्यावांचुनी । कानडा तो मनींध्यानी वसे ॥१॥ कानडा कानडा विठ्ठल कानडा । कानडा विठ्ठल कानडा ॥२॥ कानाडियांचा वेधमनींतो कानडा । कानडाची कानडा विठ्ठल माझा ॥३॥ एकपणें उभा कानडा विठ्ठल । एका जनार्दनीं नवल कानड्यांचे ॥४॥