भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां

nathache ashramin samadhirahit | muktata mukta nam tumhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ॥१॥ महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनीं ॥२॥ आनंदे समाधि सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडीं मुखोद्नत ॥३॥ एका जनार्दनीं तुमचें नाम गोड । त्रैलोकीं उघड नामकीर्ती ॥४॥