भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंत शरीर ओंगळ ओखंटें । परी तया भेटे कर्म धर्म

nashivant sharir ongal okhanten | pari taya bhete karma dharma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाशिवंत शरीर ओंगळ ओखंटें । परी तया भेटे कर्म धर्म ॥१॥ अशाश्वत शाश्वत हेंचि उमगा मनीं । तया चक्रपाणी धांवे मागें ॥२॥ देहींचे देहपण देहाचिये माथां । कर्म धर्म सत्ता देहालागीं ॥३॥ एका जनार्दनीं कर्म धर्म पाठीं । वायीं भ्रम पोटीं घेती जीव ॥४॥