भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंत सर्व एक नाम साचें । म्हणोनि वदा वाचे श्रीराम

nashivant sarva ek nam sachen | mhanoni vada vache shriram

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाशिवंत सर्व एक नाम साचें । म्हणोनि वदा वाचे श्रीराम ॥१॥ शरीर नासे संपत्ति नासे । नाम न नासे श्रीरामाचें ॥२॥ आकार नसे निराकार नासे । नाम नासे श्रीरामाचें ॥३॥ स्थुळ नासे सुक्ष्म नासे । नाम न नासे श्रीरामांचे ॥४॥ जें न नासे तें नाम वाचे । एक जनार्दनीं साचें जप करीं ॥५॥