भजनी मालिका
← भजनांकडे परत

नांदतसें नाम आकाश पाताळीं ।सर्व भुमंडळीं व्याप्त असे

nandatasen nam akash patalin |sarva bhumandalin vyapta ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नांदतसें नाम आकाश पाताळीं ।सर्व भुमंडळीं व्याप्त असे ॥१॥ पाताळ भेदोनी व्याप्त ठेलें पुढें । नाहीं त्यासी आड कोठें कांहीं ॥२॥ चौर्‍याशीं भोगिती दुर्मती पामर । संतांसी साचार शरण न जाती ॥३॥ एका जनार्दनीं नाम अविनाश । संतसंगें दोष सर्व जाती ॥४॥