भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमुं जाय तंव गुरुत्वा । तंव त्रैलोक्य आलें गुरुत्वा

namun jay tanv gurutva | tanv trailokya alen gurutva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नमुं जाय तंव गुरुत्वा । तंव त्रैलोक्य आलें गुरुत्वा ॥१॥ तें आतां नमना नुरेचि गुरु । गुरुत्वा आला संसारु ॥२॥ वंद्यत्वें नमुं गुरुभेदे । तंव त्रैलोक्य गुरुत्वें नांदें ॥३॥ गुरुवांचुनीं न दिसे कांहीं । तंव सानथोर अवयवें गुरु पाहीं ॥४॥ थोर गुरुत्वा आलें गौरव । तरी गुरुनामें नेघें अहंभाव ॥५॥ एका जनार्दनाच्या पायीं । नमुं गेलों तो गुरुशिष्य नाहीं ॥६॥