भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामीं धरा दृढ विश्वास । घाला कळिकाळावर फास । नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण

namin dhara drudh vishvas | ghala kalikalavar phas | nam hachi nijadhyas | ratrandivas smaran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामीं धरा दृढ विश्वास । घाला कळिकाळावर फास । नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण ॥१॥ सोपें वर्म कलिमाजीं । नामें तरती जन सहजीं । योगयाग तप साधनें जीं । तया प्राप्ती नामेंची ॥२॥ नाम साधनांचे सार । सोपा मंत्र हरि उच्चार । एका जनार्दनीं सार । निवडोनि काढिलें ॥३॥