भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें तारिलें पतित उद्धरिले । धांवणे तें केलें पांडवांचें

namapathen tarilen patit uddharile | dhanvane ten kelen pandavanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें तारिलें पतित उद्धरिले । धांवणे तें केलें पांडवांचें ॥१॥ पडतां सकंटीं नामपाठ गाय । द्रौपदींती माय तारियेली ॥२॥ जनार्दनाचा एक सांगतसे लोकां । नामपाठ फुका जपा आधीं ॥३॥