भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें संत पावले विसांवा । आणिक नाहीं ठेवा दुजा कांहीं

namapathen sant pavale visanva | anik nahin theva duja kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें संत पावले विसांवा । आणिक नाहीं ठेवा दुजा कांहीं ॥१॥ नामपाठें सिद्धि येईल हातां । मोक्षमार्ग तत्त्वतां नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें तरला । उद्धार तो केला जडजीवां ॥३॥