भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें निवृत्ति पावला विश्रांती । नामपाठें शांति कर्माकर्मीं

namapathen nivrutti pavala vishranti | namapathen shanti karmakarmin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें निवृत्ति पावला विश्रांती । नामपाठें शांति कर्माकर्मीं ॥१॥ म्हणोनि प्रेमभावें नामपाठ गावें । आलिंगन द्यावें संतचरण ॥२॥ जनार्दनाचा एका चिंता नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपा जगा ॥३॥