भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले

namapathen nivrutti dnyanadeva upadeshi | ohan sohan kohan sakshi kele

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले ॥१॥ तिन्हीपरता बोध तयासी बोधिला । नामपाठें झाला शांतरुप ॥२॥ जनार्दनाचा एक गमोनी मनासी । लागतो चरणांसी जनार्दना ॥३॥