भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें मोक्ष पाविजे तत्त्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं

namapathen moksha pavije tattvatan | anik ten atan sadhan nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें मोक्ष पाविजे तत्त्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं ॥१॥ नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरें नाचताहे संतापुढें ॥३॥