भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें गोरा कुंभार तरला । उद्धार तो झाला पूर्वजांचा

namapathen gora kumbhar tarala | uddhar to jhala purvajancha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें गोरा कुंभार तरला । उद्धार तो झाला पूर्वजांचा ॥१॥ नामपाठ कीर्ति गाताती वैष्णव । धन्य तो अपूर्व नाममहिमा ॥२॥ जनार्दनाचा एका चरणरजरेण । नामपाठ संकीर्तन करा वेगीं ॥३॥