भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ युक्ति जगीं सोपी जाणा । म्हणोनि नारायण आठवावें

namapath yukti jagin sopi jana | mhanoni narayan athavaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ युक्ति जगीं सोपी जाणा । म्हणोनि नारायण आठवावें ॥१॥ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । जन्ममरण खेपा दुर होती ॥२॥ जनार्दनाचा एका आवडीनें गाये । नाशिवंत पाहें शरीर आहे ॥३॥