भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ यश कीर्ति नामपाठें । तो जाय वैकुंठा हेळामात्रें

namapath yash kirti namapathen | to jay vaikuntha helamatren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ यश कीर्ति नामपाठें । तो जाय वैकुंठा हेळामात्रें ॥१॥ न करी रे जना आळस मानसीं । नामपाठ अहर्निशी जपे सदा ॥२॥ जनार्दनाच एका सांगतो आदरें । नामपाठ स्मरे वेळोवेळां ॥३॥