भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ मच्छिद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधी चौदेहांची

namapath machchhidra gorakshaten bodhi | todili upadhi chaudehanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ मच्छिद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधी चौदेहांची ॥१॥ नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा । वाचे गातां बाधा नोहे कांहीं ॥२॥ जनार्दनाचा एका द्वैताविरहित । नामपाठ गात सर्वभावें ॥३॥