भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ करितां जाईल पैं चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई

namapath karitan jail pain chinta | moksha sayujyata hatan yei

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ करितां जाईल पैं चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई ॥१॥ म्हणोनि सोपें वर्म सांगतसे तुज । नामपाठ गुज जपें सदा ॥२॥ जनार्दनाचा एक कुर्वंडी करुनी । लोळत चरणीं संताचिया ॥३॥