भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करी भेदाभेद हृदयामाजीं

namapath govind hachi lago chhand | na kari bhedabhed hrudayamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करी भेदाभेद हृदयामाजीं ॥१॥ गोविंद नाम गाय गोविंद नाम गाय । गोविंद नाम गाय हृदयीं सदा ॥२॥ जनार्दनाचा एका हृदयीं ध्यायें सच्चित्ता । गोविंद गीतीं सुख जोडे ॥३॥