भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते

namache povade varniti sabade | harinamen bagade rangale te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते ॥१॥ नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वायां जाय ॥२॥ नाम निजधीर मानुनी भरंवसा । गाती ते उल्हासा रात्रंदिन ॥३॥ एका जनार्दनीं ध्यानीं आणि मनीं । नाम संजीवनीं जपतसे ॥४॥