भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तें सोपें संकर्षण जपे । आणिक संकल्पें धरुं नको

nam ten sopen sankarshan jape | anik sankalpen dharun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तें सोपें संकर्षण जपे । आणिक संकल्पें धरुं नको ॥१॥ धरितां संकल्प नाशिवंत बापा । नाम जप सोपा मंत्रमार्ग ॥२॥ जनार्दनाच एक बोले लडिवाळ । जनार्दन कृपाळ जगीं तोची ॥३॥