भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तें ब्रह्मा नाम तें ब्रह्मा । नामापाशीं नाहीं कर्म विकर्म

nam ten brahma nam ten brahma | namapashin nahin karma vikarma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तें ब्रह्मा नाम तें ब्रह्मा । नामापाशीं नाहीं कर्म विकर्म ॥१॥ अबद्ध पढतां वेद बाधी निषिद्ध । अबद्ध नाम रटतां प्राणी होती शुद्ध ॥२॥ अबद्ध मंत्र जपतां जापक चळे । अबद्ध नाम जपतां जडमुढ उद्धरले ॥३॥ स्वधर्म कर्म करी पडे व्यंग । विष्णुस्मरणें तें समूळ होय सांग ॥४॥ मनापाशीं नाहीं विधिविधान । आसनीं शयनीं भोजनीं नाम पावन ॥५॥ एका जनार्दनीं नाम निकटीं । ब्रह्मानंदी भरली सृष्टी ॥६॥