भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम सुलभ सोपें गातां । नाहीं भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडीं

nam sulabh sopen gatan | nahin bhay ani chinta | palati doshanchya chalatha | nam gatan deshodhadin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम सुलभ सोपें गातां । नाहीं भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडीं ॥१॥ म्हणोनि धरियेली कास । जाहलों संतांचा मी दास । नाम गातां उल्हास । वारंवार मानसीं ॥२॥ उणें पुरें नको कांहीं । सोंवळें येथें नाहीं । एका जनार्दनीं देहीं । सुस्नात सर्वदा ॥३॥