भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम मुखीं सदा वाचे । कांपती कळीकाळ साचे

nam mukhin sada vache | kampati kalikal sache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम मुखीं सदा वाचे । कांपती कळीकाळ साचे ॥१॥ दो अक्षरीं रामनाम । जपतां पावसी मोक्षधाम ॥२॥ नामावांचूनि परिपाठीं । साधन नाहीं नाहीं नेहटीं ॥३॥ नाममंत्र श्रेष्ठ सार । जड जिवांसी उद्धार ॥४॥ एका जनार्दनीं नाम । सुखधामाचा विश्राम ॥५॥