भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम मुखीं गातां विषयांची वार्ता । नोहेचि सर्वथा गातीयासी

nam mukhin gatan vishayanchi varta | nohechi sarvatha gatiyasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम मुखीं गातां विषयांची वार्ता । नोहेचि सर्वथा गातीयासी ॥१॥ नाम तें पावन नाम तें पावन । नामवांचूनि जाण श्रेष्ठ कोण ॥२॥ एका जनार्दनीं नाम तें पावन । त्रिभुवनीं मंडन नाम सत्य ॥३॥