भजनी मालिका
← भजनांकडे परत

नकळे योग याग तपादि साधने

nakale yog yag tapadi sadhane

रचनाकार: संत बंका · अभंग
नकळे योग याग तपादि साधने । नेणेची लक्षण यांचे कांही ॥१॥ सुलभ सोपारे नाम आठवितां । न पडेची गुंता कर्म धर्म ॥२॥ विधिनिषेधाचें न घेवो ओझें । आणीक सहजें नकळे कांही ॥३॥ वंका म्हणे मज नामाचा आधार । उतरेन पार भवनदी ॥४॥