भजनी मालिका
← भजनांकडे परत

नकळे वो माव आगमा निगमा

nakale vo mav agama nigama

रचनाकार: संत बंका · अभंग
नकळे वो माव आगमा निगमा । जयाचा महिमा श्रुति शास्त्रां ॥१॥ तो म्यां डोळेभरी पाहिला श्रीहरी । भीवरेचे तिरीं विठ्ठलरूप ॥२॥ सुखाचा सागर भक्तांचा कैवारी । ब्रीद चराचरी गाजतसे ॥३॥ वंका म्हणे ऐसा जयाचा महिमा । सुलभ तो आम्हां भाविकांसी ॥४॥