भजनी मालिका
← भजनांकडे परत

नका करुं वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नरदेहीं

naka karun vad vivad pasara | vauga matera naradehin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नका करुं वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नरदेहीं ॥१॥ आयुष्याचे अंतीं कामा नये कोणी । नेती ढकलुनी एकलेंचि ॥२॥ स्वजन स्वगोत्र न ये कोणी कामा । सांडी त्यांचा प्रेमा परता होई ॥३॥ एका जनार्दनीं मधाचिये मासी । तैसा सांपडसी यमफांशी कोण सोडी ॥४॥