भजनी मालिका
← भजनांकडे परत

न लगें काहीं यासी मोल । वेंचितां बोल फुकाचै

na lagen kahin yasi mol | venchitan bol phukachai

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न लगें काहीं यासी मोल । वेंचितां बोल फुकाचै ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वदा वाचे । नोहे आणिकांचें कारण ॥२॥ नाचा प्रेमें वाळूवंटी । घाला मिठी संतांची ॥३॥ एका जनार्दनीं उभा । विठ्ठ्ल शोभा अनुपम्य ॥४॥