भजनी मालिका
← भजनांकडे परत

न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गांता उल्हास माना चित्तीं

na lage na lage jivacha to nash | nam ganta ulhas mana chittin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गांता उल्हास माना चित्तीं ॥१॥ पंचाग्नि साधन नको धूम्रपान । योगयाग तपन नको कांहीं ॥२॥ सुखें वाजवा टाळी मुखीं नामघोष । पातकांचा नाश कल्पकोडी ॥३॥ एकाजनार्दनीं नाम एक समर्थ । तेणें स्वार्थ पुरे सर्व जीवां ॥४॥