भजनी मालिका
← भजनांकडे परत

न करी आळस रामनाम घेतां । वाचे उच्चारितां काय वेंचे

na kari alas ramanam ghetan | vache uchcharitan kay venche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न करी आळस रामनाम घेतां । वाचे उच्चारितां काय वेंचे ॥१॥ न लगे द्रव्य धन वेचणेंचि कांहीं । रामनाम गाई सदा मुखीं ॥२॥ सोहळे आचार न लगे विचार । पवित्र परिकर नाम मुखीं ॥३॥ शुद्ध याति कुळ अथवा चांडाळ । स्त्री अथवा बाळ हो कां नीच ॥४॥ एका जनार्दनीं नाहीं यातीचें कारण । वाचे उच्चारण तोचि शुचि ॥५॥