भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्यां गुरु केला म्यां गुरु केला । सर्व बोध तेणें मज दिधला

myan guru kela myan guru kela | sarva bodh tenen maj didhala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
म्यां गुरु केला म्यां गुरु केला । सर्व बोध तेणें मज दिधला ॥१॥ घालुनियां भक्ति अंजन । दावियेलें विठ्ठलनिधान ॥२॥ कान फुकुनि निगुती । दिधलें संताचिये हाती ॥३॥ एका जनार्दनीं गुरु बरा । तेणें दाविलें परात्परा ॥४॥