भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूर्ति सांवळी गोमटी । अंगीं केशराची उटी

murti sanvali gomati | angin kesharachi uti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मूर्ति सांवळी गोमटी । अंगीं केशराची उटी ॥१॥ मुगुट कुंडलें वनमाळा । टिळक रेखिला पिवळा ॥२॥ कणीं कुडल मकराकार । गळं शोभें वैजयंती हार ॥३॥ नेत्र आकर्ण सुकुमार । एका जनार्दनीं विटेवर ॥४॥