भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरें कोविळीं तीं

murti anupamya vitevari sajiri | paulen gojiren kovilin tin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरें कोविळीं तीं ॥१॥ तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारी परतेना ॥२॥ वेधलासेंअ जीव सुखा नाहीं पार । माहेर माहेर पंढरी देखा ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची वसती । भाविकां विश्रांती पंढरीरावा ॥४॥