भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो

muni mukta jhale bhenen garbhavasa | amhan vishnudasan sulabh to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥ अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥ पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥२॥ तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥३॥