भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा

mulincha tumhan lagala chala | to gopala na sanda

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥ घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥ तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥३॥