भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुळींच पापाचा नाहीं लेश । ऐसा घोष नामाचा

mulinch papacha nahin lesh | aisa ghosh namacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुळींच पापाचा नाहीं लेश । ऐसा घोष नामाचा ॥१॥ ब्रह्माहत्या मात्रागमन । दारूण कठीण पाप हें ॥२॥ तेंही नासें नामें कोटी । उच्चारी होटीं रामनाम ॥३॥ नामें नासे पाप । एका जनार्दनीं अनुताप ॥४॥