भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे

mulachiya mulen | duhkhen vadhati sakale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥ ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥ तुका म्हणे थीते । दुःख पाववावें चित्ते ॥३॥