भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम

mudalamadhyen pade tota | aisa khota udim

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥ एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥३॥