भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरीनामें विण

mrutyulokin amhan avadati pari | nahin eka harinamen vin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरीनामें विण ॥१॥ विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥ सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥२॥ तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥