भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळीं पहातां दिसतसे जळ । परी तें कोरडेंचि केवळ

mrugajalin pahatan disatase jal | pari ten koradenchi keval

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मृगजळीं पहातां दिसतसे जळ । परी तें कोरडेंचि केवळ ॥१॥ तेवीं दिसे जगदाभास । अवघा मिथ्या साभिलाष ॥२॥ जेथें मिथ्या द्वैत भाविक । पहातां जनार्दनचि एक ॥३॥ तरंग हरपलें पाणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥