भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल

mrugajalachya purin guntashin pamara | kon tuj nirdhara sodavil

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥ पडशी पतनी चौर्‍यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥ जीवीं जीवपण शिवीं शीवपण । वेगळें तें जाण दोन्हीं होती ॥३॥ यातना अनंत तुज भोगविती । तेथें काकुळती कोणा येशी ॥४॥ यमाचे ते दूत मारिती पामरा । कां रे संसारा न चुकशी ॥५॥ एका जनार्दनीं सांगतो विचार । रामनामें परिकर जप करी ॥६॥