भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळाचें दोहीं निःशेष जळ नाहीं । यापरी माया समूळ मिथ्या पाहीं

mrugajalachen dohin nihshesh jal nahin | yapari maya samul mithya pahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मृगजळाचें दोहीं निःशेष जळ नाहीं । यापरी माया समूळ मिथ्या पाहीं ॥१॥ माया नाहीं माया नाहीं । जगचि ब्रह्मारुप पाहीं ॥२॥ दोराचें सर्पत्व जिताचि मेलें । मायोची बद्धता तुजचि तुझेनि बोले ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां चैतन्यघन । बद्धता मुक्तता समुळ मिथ्या जाण ॥४॥